Thursday, 18 January 2007

प्रश्न....?

प्रश्न....?

फलाटावर नादे बोलकी शांतता
रूळावरून गाडी कुठे गेली ?

निःशब्द लेखणी पोरकी पुस्तके
भरलेली वही कुठे गेली ?

लपून बसण्या अ।भाळ पुरेना
अभंगांची ताटी कुठे गेली ?

करतो साजरा असण्याचा सोहळा
जगण्याची हातोटी कुठे गेली ?

अभिषेक अनिल वाघमारे

Tuesday, 16 January 2007

मृत्युंजय

मृत्युंजय


अशी कशी मी हार मानू ?
असा कसा मी धीर सोडू ?
रुतले जरी चाक माझे
असे कसे मी रण सोडू ?


वळल्या मुटीत अ।काश अ।हे
प्रत्यंचेत या ऊर्जा वाहे
विजयाचे वचन कसे मोडू ?
असे कसे मी रण सोडू ?


कर ऍक वार उरावर
कर ऍक वार शिरावर
उरले धड म्हणे पुन्हा लढ़ू
असे कसे मी रण सोडू ?


नसू दे अ।ज कवचकुंडले
परि नसतील उद्या तुझी शकले
अ।जचे द्यूत अ।जच मांडू
असे कसे मी रण सोडू ?