Sunday, 9 November 2014

इंटरस्टेलार:- इन्टू दॅट गुड नाइट......

इंटरस्टेलार:- इन्टू दॅट गुड नाइट......

आम्हाला आमचंच काय होणार हे माहीत नसताना आमच्या पुढच्या पिढ्यांचं काय होणार याची एक चिंता जगभरच्या विचारी माणसांना लागलेली असते म्हणतात . कधी ना कधी माणसाला ही पृथ्वी सोडून दुसरीकडे म्हणजे एखाद्या दुसर्‍या ग्रहावर आसरा घ्यावा लागणार हे निश्चित ,असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. पण हे दुसरीकडे म्हणजे कुठे आणि कसं आणि ते इतकं सोपं आहे का ? हेच शोधण्याचा प्रयत्नातील एका शक्यतेचं दर्शन ब्रिटीश वंशाचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान आपल्याला त्याच्या 'इंटरस्टेलार' या सिनेमातून घडवतो. त्याच्या आधीच्या इंसेप्शन, प्रेस्टीज, मेमेंटो आणि बॅटमॅन मालिकेप्रमाणेच अत्यंत विचारपूर्वक बनवलेला हा साय-फाय चित्रपट.