Monday, 7 December 2015

वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ???

वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ???
मध्यंतरी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नव्या संचातील पुनरूज्जीवित 'वाडा चिरेबंदी' बघण्याचा योग आला. हे नाटक मी याआधी वाचलेले होते. परंतु नाटक वाचणे वेगळे आणि प्रत्यक्ष सादरीकरण वेगळे. मागच्या वेळेस चंद्रकांत कुलकर्णींच्यांच दिग्दर्शनात या नाटकाचे प्रयोग झाले तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो. त्यामुळे आज तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या आमच्या पिढीला भारतीय रंगभूमीच्या वाटचालीत मैलाचा दगड असलेले हे नाटक प्रत्यक्ष मंचावर पाहायला मिळेल अशी आशा नव्हती. टीव्ही-सिनेमातील 'स्टार' कलावंतांच्या नाममहिम्याचा फायदा घेणारी व्यावसायिक गणिते जुळवून का होईना पण निर्मात्यांनी पुन्हा एकदा हे धाडस केले याबद्द्ल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.

Saturday, 22 August 2015

आम्ही सारे राजकारणी

महाराष्ट्र ढवळून काढणार्‍या 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कारवादावर आपली भूमिका स्पष्ट करणारे मुक्ता दाभोलकर यांचे पत्र दै.लोकसत्तात(२० ऑगस्ट२०१५) रोजी प्रसिद्ध झाले .  ते येथे वाचता येईल.

या पत्रावर प्रतिक्रिया म्हणून माझे पत्र लोकसत्तामध्ये (२१ ऑगस्ट २०१५)ला प्रसिद्ध झाले. ते येथे (पुढारी इतके भाबडे, तर चळवळ वाढेल का?) वाचता येईल.

याच पत्राचा मूळ तर्जुमा खाली देतो आहे.

***************************************************************************

Monday, 17 August 2015

मसान: एक आधुनिक शोकात्मिका


मसान:  एक आधुनिक शोकात्मिका
            मसान’ या अनुराग कश्यप स्कूलमधून निघालेल्या नव्या चित्रपटाचं  आंतरराष्ट्रीय  नाव  आहे ‘फ्लाय अवे सोलो’.  आणि हेच शीर्षक अधिक समर्पक  आहे असं ‘मसान’ बघितल्यावर वाटलं. मसान नावावरून या चित्रपटात काहीतरी स्मशानासंबंधी,  भुताखेताचं , अतर्क्य,  गूढ कथानक असेल असा समज होण्याची  शक्यता आहे. पण ही कहाणी तशी नाही. ती एकाच वेळी समाजातील वर्गघर्षणाची (संघर्ष हा शब्द जरा कठोर होईल) आणि पात्रांच्या  वैयक्तिक संघर्षाचीही आहे.

Wednesday, 15 July 2015

किल्ला: आहे मनोहर तरी........


तर मराठीत सध्या वयात येतानाच्या गोष्टी सांगणार्‍या सिनेमांची लाट आली आहे. किशोरवयीन-कुमारवयीन मुलांचे भावविश्व कधी कलात्मकतेने तर कधी तद्द्न व्यावसायिक हेतूने मांडणारे अनेक चित्रपट मधल्या काळात येऊन गेले. उदा. विहीर, शाळा, बालक-पालक,टाईमपास,फॅण्ड्री इ.इ. याच माळेतला एक नवा मणी म्हणजे किल्ला’. सिनेमाची तपशीलवार कथा सांगून समीक्षेने  रसिकांच्या रसभंगाचं पाप करू नये असं मला वाटतं. म्हणून सरधोपटपणे कथा सांगणं इथे टाळलं आहे.

Wednesday, 8 April 2015

डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा !


डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा ! 


SPOILER ALERT:  लेखातील काही वाक्यांमधून कथानकाचा उलगडा होऊ शकतो. त्यामुळे सावधान !


विद्वान लोक [म्हणजे अर्थातच आम्ही नव्हे] असं म्हणतात की मूळचे रामायण आणि महाभारत हे ग्रंथ अगदी छोटे होते. पण नंतर मात्र सांगणार्‍या प्रत्येकाने त्यात आपल्या हातचे लावले. अश्या बूंद बूंदने  हे ज्ञानाचे  सागर  तयार झाले . याचप्रकारे सर आर्थर कॉनन डॉयलच्या मूळ शेरलॉक होम्सचं बंगालीकरण- भारतीयकरण करून शरदिंदु बंदोपाध्याय यांनी व्योमकेश बक्षी आणि अजित [म्हणजे आपला देशी डॉ. वॉटसन बरं का !] यांना जन्माला घातले. त्यात नंतर अनेक सिनेमा-नाट्य-टीव्हीकारांनी आपापल्या परीने तिखट मीठ लावून वेगवेगळी व्यंजने तयार केली. त्यातलंच एक ताजं व्यंजन म्हणजे दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी. आता हे व्यंजन तिखट, तुरट की आंबट हे ज्याने त्याने सिनेमागृहात जाऊनच ठरवायचं आहे.(ही गोष्ट परंपरागत समीक्षक सर्वात शेवटी सांगतात, पण आम्ही प्रामाणिक आहोत. असो.)

Tuesday, 10 February 2015

शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिकाशमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका

अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांच्यात साम्य काय असं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन दोघांमध्ये भलेही जमीनअस्मानचा  फरक असेल पण एक साम्य आहे ते म्हणजे अमिताभही देव आनंदसारखा म्हातारपणी दिवसेंदिवस तरूण होत चालला आहे. निदान ताजाताजा  शमिताभ पाहून मला तरी असंच वाटलं. लौकिकार्थाने प्रचंड यशस्वी कारकिर्दीच्या आखरी पडाव वर, पिक्चर पडला तरी हारण्यासारखं काहीच नाही अशा एका स्थितीला पोचल्यावर आता अमिताभने स्वत:ची मन की बात ऐकत वेगवेगळे प्रयोग करायला सुरूवात करूनही आता बराच काळ लोटला आहे. स्वत: केवळ स्वत:साठीच पिक्चर काढण्याच्या किशोर कुमार, देव आनंद यांच्या लहरी वाटेवर अमिताभही आता चालायला लागला आहे, हे शमिताभ पाहिल्यावर मला प्रकर्षाने जाणवलं.