Wednesday, 15 July 2015

किल्ला: आहे मनोहर तरी........


तर मराठीत सध्या वयात येतानाच्या गोष्टी सांगणार्‍या सिनेमांची लाट आली आहे. किशोरवयीन-कुमारवयीन मुलांचे भावविश्व कधी कलात्मकतेने तर कधी तद्द्न व्यावसायिक हेतूने मांडणारे अनेक चित्रपट मधल्या काळात येऊन गेले. उदा. विहीर, शाळा, बालक-पालक,टाईमपास,फॅण्ड्री इ.इ. याच माळेतला एक नवा मणी म्हणजे किल्ला’. सिनेमाची तपशीलवार कथा सांगून समीक्षेने  रसिकांच्या रसभंगाचं पाप करू नये असं मला वाटतं. म्हणून सरधोपटपणे कथा सांगणं इथे टाळलं आहे.